नेवासा तालुक्यात आढळले ४०२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:45+5:302021-05-20T04:22:45+5:30
नेवासा : सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून बुधवारी तालुक्यातील ७६ गावांमध्ये तब्बल चारशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून ...
नेवासा : सलग दुसऱ्या दिवशी तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून बुधवारी तालुक्यातील ७६ गावांमध्ये तब्बल चारशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर, रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. शहरात मागील दीड महिन्यांपासून होत असलेल्या रुग्णवाढीला गेल्या दोन दिवसांपासून ब्रेक लागला होता. रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली होती. सोमवारी आठ तर मंगळवारी अवघे सहा रुग्ण नेवासा शहरात आढळून आले होते. मात्र, बुधवारी तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून तब्बल ५७ रग्ण आढळून आले. त्याचबरोबर सोनई येथे सातत्याने रुग्णवाढ होत आहे. सोनई येथे ४२, निंभारी २९, मुकिंदपूर २५, सुलतानपूर १४, पुनतगाव १२, चांदा १२, शिंगणापूर ११, भानसहिवरा ११, भेंडा बुद्रुक १० या दहा गावांसह ७६ गावांमध्ये रुग्णवाढ झाली आहे.