ब्राम्हणवाडा, धुमाळवाडीत ४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:20 AM2020-08-26T11:20:21+5:302020-08-26T11:20:50+5:30
अकोले तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
अकोले : तालुक्यात मंगळवारी (दि.२५) उच्चांकी कोरोनाबाधित आढळून आले. ब्राम्हणवाडा व धुमाळवाडी कोरोना हॉटस्पॉट ठरला असून तालुक्यात तब्बल ४१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
एकूण संख्या पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहे. एकूण रुग्णसंख्या ४४९ झाली आहे धुमाळवाडी १२, ब्राम्हणवाडा १२, रेडे ९, आंभोळ १, नवलेवाडी १, देवठाण १, खानापूर १, शहरातील महालक्ष्मी कॉलणी १, हनुमान मंदिरजवळ १, जामगाव १, कोतूळ अशी एकूण ४१ व्यक्ती कोरोना बाधित झाले आहे.
खानापुर कोविड सेंटर, धुमाळवाडी येथे घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये धुमाळवाडी येथील २६ व ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ५० अँटीजन टेस्टमध्ये १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये ब्राम्हणवाडा येथील १२ व्यक्ती पॉझिटिव्ह आले.
अकोले तालुक्यात आज दिवसभरात आतापर्यतची सर्वाधिक म्हणजेच तब्बल ४१ रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४४९ झाली आहे त्यापैकी ३१६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १२३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.