जिल्ह्यात नव्याने वाढले ४५ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:21 AM2021-01-25T04:21:14+5:302021-01-25T04:21:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतलेल्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात नव्याने ४५ हजार ...

45,000 new voters have been added in the district | जिल्ह्यात नव्याने वाढले ४५ हजार मतदार

जिल्ह्यात नव्याने वाढले ४५ हजार मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतलेल्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात नव्याने ४५ हजार ३३४ मतदार वाढले आहेत. या मतदारांना १ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या आता ३५ लाख ४ हजार ७७ इतकी झाली आहे.

प्रशासनातर्फे २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने १७ नोव्हेंबरपासून विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. १ जानेवारी २०२१ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यात ४५ हजार ३३४ मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या नव्या तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात नव्याने मतदार नोंदणी झाल्यानंतर १५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ही ३५ लाख ४ हजार ७७ इतकी झाली आहे. यात १८ लाख २२ हजार ३२३ इतके पुरुष, १६ लाख ८९ हजार ६९६ महिला आणि १३८ इतर मतदार आहेत. मतदार यादीतील दिव्यांग मतदारांची संख्या १५ हजार ८१३ इतकी आहे.

------------------

मतदार नोंदणीप्रक्रिया निरंतर सुरू असून अद्याप ज्या नागरिकांनी अथवा ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले आहे, त्या व्यक्तींनी नमुना ६ भरून आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. तसेच ज्या मतदारांना नावे वगळावयाची आहेत त्यांनी नमुना ७, मतदार यादीतील आपल्या माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास नमुना ८ आणि एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागात नाव स्थलांतरित करायचे असल्यास नमुना ८-अ भरावा.

-जितेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

--------------

असे झाले नवे मतदार व बदल

१८ वर्षे पूर्ण झालेले नवे मतदार (नमुना-६)- ४५३३४

तपशीलात चुका दुरुस्ती (नुमना ८)- ७३०८

दुबार मतदार वगळले, स्थलांतर झालेले (नमुना ७)- १४९८१

मतदारसंघात बदल केलेले (नमुना ८-अ)- २३९०

पुन:रिक्षण कार्यक्रमात भाग घेतलेले मतदार- ७००१३

--------------------

असे आहेत जिल्ह्याचे मतदार

मतदारसंघ नवे मतदार स्त्री मतदार पुरुष मतदार एकूण मतदार

अकोले २०६७ १३३१९१ १२१३८२ २५४५७३

संगमनेर ४१९४ १३९९७० १२९६३२ २६९६०२

शिर्डी ३२४५ १३५९१४ १२६५१७ २६२५१९

कोपरगाव ३९३८ १३५९१४ १३०३९१ २६६३०८

श्रीरामपूर २७१८ १४८९२७ १४३००८ २९१९७९

नेवासा २१०९ १३९२०१ १२६७७५ २६५९७९

शेवगाव ५६६५ १७९२०७ १६३१९१ ३४२४००

राहुरी ४९८२ १५४५६९ १३९८०६ २९४३७५

पारनेर ६२१० १६९७७८ १५६९१६ ३२६६९८

नगर शहर ११३१ १४८३७९ १३९९५५ २८८४०५

श्रीगोंदा २९९६ १६३१९८ १४८६९९ ३११८९९

कर्जत-जामखेड ६०८२ १७३९९५ १५५३४४ ३२९३४०

एकूण ४५३३४ १८,२२,३२३ १६,८१,६१६ ३५,०४,०७७

-------------

फाईल फोटो- मतदानाचे बोट दाखविताना

Web Title: 45,000 new voters have been added in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.