४७ गावे तंटामुक्त
By Admin | Published: September 13, 2014 10:38 PM2014-09-13T22:38:21+5:302014-09-13T22:48:18+5:30
राहुरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्यात सातव्या वर्षी ४७ गावे तंटामुक्त झाली आहेत़
राहुरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्यात सातव्या वर्षी ४७ गावे तंटामुक्त झाली आहेत़ याशिवाय तीन गावांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार घोषित झाले असून त्यामध्ये राहुरी तालुक्यातील कानडगाव, संगमनेर तालुक्यातील पारेगाव, तर श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे या गावांचा समावेश आहे़ १ कोटी २९ लाख रूपयांचे पुरस्कार तंटामुक्त गावांना मिळणार आहेत़
गेल्या सात वर्षांत अहमदनगर जिल्ह्यात सातशे गावे तंटामुक्त झाली आहेत़ जिल्हांतर्गत व जिल्हा बाह्य तंटामुक्ती समित्यांनी गावांची पाहणी करून मूल्यांकन केले आहे.दोनशे गुणांपैकी कानडगाव, पारेगाव व बांगर्डे या तीन गावांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाल्याने त्यांना राज्य शासनाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला. यंदा अकोले तालुक्याने सर्वाधिक ९ पुरस्कार पटकावले़ मात्र राहाता व जामखेड या तालुक्यांतील एकाही गावाला पुरस्कार मिळाला नाही. पुरस्कारांचे धनादेश लवकरच समित्यांना देण्यात येणार आहेत़
यंदा तंटामुक्त गाव मोहिमेचे हे आठवे वर्ष आहे़ राज्यात आतापर्यंत सोळा हजार गावे तंटामुक्त झाली आहेत़
यंदा जिल्ह्यातील १२०४ गावांनी अभियानात सहभाग नोंदविला आहे. यासंदर्भात विशेष ग्रामसभेत तंटामुक्त अभियानाचा ठराव पारीत करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठविण्यात आला़ (तालुका प्रतिनिधी)