आरटीईच्या ३०१३ जागांसाठी ४८४८ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:25+5:302021-04-06T04:19:25+5:30
अहमदनगर : आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात ३०१३ जागांसाठी ४ हजार ८४८ अर्ज दाखल झाले आहेत. यातून लाॅटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना ...
अहमदनगर : आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात ३०१३ जागांसाठी ४ हजार ८४८ अर्ज दाखल झाले आहेत. यातून लाॅटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) २०१९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नाहीत. मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे खासगी इंग्रजी किंवा इतर दर्जात्मक शाळेत शिकण्याची संधी मिळते. पूर्व प्राथमिक किंवा पहिलीच्या वर्गात या प्रक्रियेतून प्रवेश मिळतो.
शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत ३० मार्चपर्यंत होती. नगर जिल्ह्यातील ४०२ शाळांची आरटीईअंतर्गत नाेंदणी केली. त्यानुसार त्या शाळांसाठी शिक्षण विभागातून ३०१३ जागांसाठी ॲानलाइन अर्ज मागवण्यात आले. ३० मार्चपर्यंत एकूण ४ हजार ४४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
----------
६ एप्रिलला लाॅटरी
आता या अर्जांतून कागदपत्रांची छाननी व नंतर अर्ज जास्त असल्याने लाॅटरी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. पूर्ण राज्यभरात ६ एप्रिलला या प्रवेशासाठी लाॅटरी पद्धतीने नावे काढली जातील.
---------
तांत्रिक अडचणीमुळे दोनदा मुदतवाढ
आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली हाेती. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती. मात्र, पालकांना हा अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी आल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्यात आली हाेती.
------------
ॲानलाइन नोंदणी झालेल्या शाळा - ४०२
आरटीईअंतर्गत एकूण जागा - ३०१३
आलेले अर्ज - ४८४८
सोडत - ६ एप्रिल
-------
फोटो- आरटीई डमी १,२,३