कारेगावात ५ लाखांचा ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 06:17 PM2019-03-23T18:17:20+5:302019-03-23T18:17:36+5:30

तालुक्यातील कारेगाव येथील महिला शेतकरी सगुणा प्रल्हाद पटारे यांच्या शेतातील ऊस शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

5 lakhs of sugarcane burns in Karegaon | कारेगावात ५ लाखांचा ऊस जळून खाक

कारेगावात ५ लाखांचा ऊस जळून खाक

श्रीरामपूर : तालुक्यातील कारेगाव येथील महिला शेतकरी सगुणा प्रल्हाद पटारे यांच्या शेतातील ऊस शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्यात सुमारे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
पटारे यांची कारेगाव शिवारात गट क्रमांक ४५२ मध्ये शेतजमीन आहे. या शेतीत पटारे यांनी ३ एकर २० गुंठे क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतात अचानक शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. आगीच्या ज्वाला भडकल्याने संपुर्ण ऊस जळून खाक झाला. आगीमुळे सुमारे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

 

Web Title: 5 lakhs of sugarcane burns in Karegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.