५ टक्के रुग्ण १६ वर्षांखालील, पण लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:34+5:302021-04-22T04:20:34+5:30
नगर जिल्ह्यासह राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, नंतर महसूल, पोलीस व ...
नगर जिल्ह्यासह राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, नंतर महसूल, पोलीस व पुढील टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत नगर जिल्ह्यात चार लाख लसीचे डोस प्राप्त झाले असून त्यातून आतापर्यंतचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण झाले आहे. परंतु अनेक लोक लसीकरणासाठी केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. त्यांना लस कमी पडत आहे. जिल्हा प्रशासनालाही राज्याकडून लसीकरणाचा पाहिजे तेवढा साठा उपलब्ध होत नाही. म्हणून ही गैरसोय होत आहे. अशात आता १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांनाच लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परिणामी लसीकरण केंद्रांवर ताण येणार आहे. यात शासनाकडून डोसचे प्रमाण वाढले नाही, तर ही लसीकरण यंत्रणा कोलमडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-----------
१६ वर्षांखालचे दीड हजार रुग्ण
नगर जिल्ह्यात सध्या २१ हजार २७७ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यात १६ वर्षांखालील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुमारे दीड हजार आहे. एकूण रुग्णांत हे प्रमाण ५ टक्के आहे.
------------
४५ पेक्षा कमी वयाचे साडेपाच हजार रुग्ण
एकूण २१ हजार २७७ रुग्णांपैकी १६ ते ४५ या वयोगटातील रुग्णसंख्या ४ हजार इतकी आहे. तर १६ वर्षांखालील रुग्णसंख्या दीड हजार आहे. असे एकूण साडेपाच हजार रुग्ण ४५ पेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण अगदी नगण्य आहे. दरम्यानए अद्याप ४५ पेक्षा कमी वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात नाही. ४५ पेक्षा पुढील वयाचे ७५ टक्के रुग्ण असून त्यांची आकडेवारी सुमारे १६ हजार आहे.
---------------
१८ वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी लस येत नाही तोपर्यंत मुलांसह युवकांची पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग याबरोबर इतर गोष्टींकडेही पालकांनी लक्ष द्यावे. मुलांना थंड पदार्थ देऊ नयेत, जास्तीत जास्त पाणी प्यावे, शक्यतो मुलांना घरचेच अन्न द्यावे, कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डाॅ. सुचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ
-------
डमी
नेट फोटो
बॉय
१९ व्हॅक्सिन फॉर चिल्ड्रन डमी
व्हॉक्सिन