संगमनेर मर्चंटला ५. ४३ कोटींचा करपूर्व नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:52+5:302021-04-05T04:18:52+5:30
कोरोना महामारीच्या कठीण काळातही उद्योजक व्यावसायिक व्यापारी सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक यांनी बँकेवर शंभर टक्के विश्वास टाकून भक्कम ...
कोरोना महामारीच्या कठीण काळातही उद्योजक व्यावसायिक व्यापारी सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक यांनी बँकेवर शंभर टक्के विश्वास टाकून भक्कम साथ दिल्याने आर्थिक प्रगतीची वाटचाल अखंड सुरू आहे. संचालक मंडळाचा ग्राहकाभिमुख आणि एक विचाराने केला जाणारा कारभार आणि त्याला सर्व घटकांनी मनापासून दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले आहे.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत ओंकारनाथ मालपाणी व त्यांच्या व्यापारी सहकाऱ्यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या मर्चंटस बँकेच्या प्रगतीचा आलेख ५४ वर्षे सतत उंचावत ठेवण्यासाठी काटकसर करून केलेला पारदर्शक लोकाभिमुख कारभार कारणीभूत आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून वेगवान व अचूक सेवा दिली जात असल्याने बँकेकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग आकर्षित होऊन वळला असून बँकेच्या धोरणावर जनतेने केलेले शिक्कामोर्तब आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वेगवान सुविधा दिल्याने बँक सर्व स्तरात हे लोकप्रिय ठरली आहे. या वर्षात १.२५ कोटी आयकर भरून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. अंतर्गत तरतुदीसाठी उपलब्ध केलेला निधी १.१५ कोटी इतका असून आयकर वजा जाता करोत्तर नफा निव्वळ नफा ३.०३ कोटी झाला आहे. यंदा एकूण कर्ज वाटप २३५.६० कोटी इतके करण्यात आले आहे. बँकेचे वसूल भाग भांडवल ७.९६ कोटी झाले असून ३०.४८ कोटींचा भक्कम स्वनिधी बँकेकडे आहे.