५० तासांनी नदीपात्रात आढळला रेल्वे पोलिसाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:42 AM2020-09-27T11:42:47+5:302020-09-27T11:43:37+5:30
पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधबा परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मिंत्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे भोव-यात सापडून बुडाले होते. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी धरणाखालील नदीपात्रात वासुंदेच्या ठाकरवाडीत आढळून आला.
टाकळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाखालील रुईचोंडा धबधबा परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन मिंत्रांबरोबर गेलेले रेल्वे पोलीस गणेश दहिफळे हे भोव-यात सापडून बुडाले होते. त्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी धरणाखालील नदीपात्रात वासुंदेच्या ठाकरवाडीत आढळून आला.
महसूल व पोलीस पथक शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिफळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दहिफळे यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले होते.
मेजर मनोजकुमार यांच्या नेतृत्वाखाली १८ जणांच्या पथकाने सहा तास शोध मोहीम राबविली. पाणबुडीच्या साहाय्याने खाली डोहामध्ये शोध घेतला. परंतु दहिफळे यांचा शोध लागला नाही. अखेरीस ही शोध मोहीम थांबविली होती.
दरम्यान, सायंकाळी काही आदिवासींनी ठाकरवाडीच्या नदीपात्रात एक मृतदेह असल्याची माहिती दिली. यावरुन दहिफळे यांचा शोध लागला.