पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी : आमदार राम शिंदे, पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश

By अरुण वाघमोडे | Published: April 17, 2023 06:38 PM2023-04-17T18:38:51+5:302023-04-17T18:39:04+5:30

याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव स.हा.धुरी यांनी काढले आहेत.

50 lakh fund for Punyaslok Ahilyabai Holkar Jayanti: MLA Ram Shinde, Gopichand Padalkar's pursuit successful | पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी : आमदार राम शिंदे, पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी : आमदार राम शिंदे, पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश

अहमदनगर - अहमदनगर: राज्यासह देशभरतील धनगर समाजाचे उर्जास्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी (ता.जामखेड) येथील जयंती सोहळ्यासाठी 50 लाख रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी 3 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार व आमदार गोपीचंद पडळकर यांनी 4 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून निधी उपलब्ध करुन देत असल्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव स.हा.धुरी यांनी काढले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 अंतर्गतच्या इतर जिल्हा योजनेतून एकवेळचे विशेष बाब म्हणून 50 लाख रुपये इतका निधी इतर योजनांच्या बचतीतून उपलब्ध करुन देण्यास शासन मान्यता देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे 2023 रोजी चौंडी येथे साजरी होणार असून, सरकारच्या या निर्णयाचे धनगर समाजाने स्वागत केले आहे.

Web Title: 50 lakh fund for Punyaslok Ahilyabai Holkar Jayanti: MLA Ram Shinde, Gopichand Padalkar's pursuit successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.