कोपरगावात पाचशे बेड्सचे जम्बो कोविड सेंटर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:32+5:302021-04-11T04:20:32+5:30

कोपरगाव : येथील साईबाबा तपोभूमीच्या महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या भव्य हॉलमध्ये ५०० बेड्सचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात ...

A 500-bed Jumbo Covid Center will be started in Kopargaon | कोपरगावात पाचशे बेड्सचे जम्बो कोविड सेंटर सुरू होणार

कोपरगावात पाचशे बेड्सचे जम्बो कोविड सेंटर सुरू होणार

कोपरगाव : येथील साईबाबा तपोभूमीच्या महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या भव्य हॉलमध्ये ५०० बेड्सचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या एसएसजीएम कोविड सेंटरमध्ये १०० ऑक्सिजन बेड्स आमदार आशुतोष काळे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सहायक घटना व्यवस्थापक प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

सरोदे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात मागील महिन्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही रुग्णांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. कोरोना संकटाचे उग्र रूप पाहता भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारून चालणार नाही. त्यासाठी ५०० बेड्सचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी बाधित रुग्णांना उपचार घेण्याच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याच्या मध्यावर असलेल्या साईबाबा तपोभूमी येथे महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या दोनही भव्य हॉलमध्ये सर्व सुविधांनी युक्त जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आमदार काळे यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्यासह मी नुकतीच आरोग्य साईबाबा तपोभूमी येथे पाहणी करून जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. यावेळी साईबाबा तपोभूमीचे सचिव धरम बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक मंदार पहाडे उपस्थित होते.

Web Title: A 500-bed Jumbo Covid Center will be started in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.