जिल्ह्यात तासाला ५१ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:00+5:302021-03-29T04:15:00+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रविवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १ हजार ...
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रविवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १ हजार २२८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ३५४ रुग्ण एकट्या नगर शहरातील आहेत. जिल्ह्यात २४ तासांत १,२२८ रुग्ण आढळून आल्याने एका तासाला ५१ रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी ८५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ५ हजार २४२ इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत प्रथमच पाच हजारांच्या वर गेली आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५९९ आणि अँटिजन चाचणीत ३७२ रुग्ण बाधित आढळले. सुदैवाने गेल्या दोन दिवसांमध्ये एकाचाही कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे. सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. त्या खालोखाल राहाता तालुक्यात १२६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
--------------------
बरे झालेली रुग्णसंख्या : ८४,३६१
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५,२४२
मृत्यू : १,१९२
एकूण रुग्णसंख्या : ९०,७९५
---------
रविवारचे पॉझिटिव्ह
अहमदनगर (३५४), राहाता (१२६), कोपरगाव (८९), संगमनेर (८४), राहुरी (८२), श्रीरामपूर (७९), कर्जत (५९), नेवासा (५२), जामखेड (४७), अकोले (३९), पाथर्डी (३९), नगर ग्रामीण (३७), पारनेर (३५), श्रीगोंदा (३३), कन्टोन्मेंट बोर्ड (२९), परजिल्हा (२२), शेवगाव (२२). एकूण (१,२२८)
-----------