५२ टीएमसी पाणी आणणार कसे ? राधाकृष्ण विखे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:25 AM2017-12-23T03:25:18+5:302017-12-23T03:25:27+5:30
दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकार करीत असले तरी, सरकारची भूमिका गोंधळ निर्माण करणारी आहे. हे पाणी कुठून व कसे आणणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
राहाता : दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकार करीत असले तरी, सरकारची भूमिका गोंधळ निर्माण करणारी आहे. हे पाणी कुठून व कसे आणणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
प्रकल्पासंदर्भातील आक्षेप दूर करण्यासाठी गोदावरी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींची सरकारने तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. दमणगंगा, नारपार, गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी नदीजोड प्रकल्पासंदर्भात विखे यांनी गुरुवारी लक्षवेधी सूचना मांडली होती. सरकारच्या या प्रकल्पासंदर्भातील धोरणाला आक्षेप घेत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. दमणगंगा, नारपार, गोदावरी नदीजोड प्रकल्पासंदर्भातील सरकारची भूमिका संदिग्धता निर्माण करणारी आहे.
आघाडी सरकारने प्राथमिक करार केला होता. अभ्यास करून, दोन्ही बाजूंकडून उपलब्ध होणाºया माहितीच्या आधारे अंतिम करार करावा, असे ठरल्यानंतरही सरकार थेट कामाची सुरुवात करीत आहे, असे त्यांनी सांगितले. लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींना तसेच शेतकºयांना विश्वासात न घेता सरकारने प्रकल्पाची कार्यवाही कशी सुरू केली, असा प्रश्नही त्यांनी केला.