जिल्ह्यातील ५२ गावे संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:58+5:302021-01-13T04:53:58+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या ...
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. निवडणूक होत असलेल्या गावांपैकी ५२ गावे संवेदनशील म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. या गावांमध्ये महसूल यंत्रणेसह पोलीसही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार असल्याने प्रशासनाने संबंधित गावांमध्ये सतर्कतेचा आदेश दिला आहे. सर्वाधिक गावे पारनेर तालुक्यात आहेत. त्या खालोखाल पाथर्डी तालुक्यात १२ गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.
--------
तालुकानिहाय संवेदनशील गावे
नगर (३)- दरेवाडी, बुऱ्हाणनगर, निंबळक,
पारनेर (१७)- निघोज, शिरापूर, जवळा, कर्जुले हर्या, टाकळी ढोकेश्वर, वासुंदा, देसोडे, रेनवाडी, कान्हुर पठार, मांडवे खुर्द, पिंपळगाव रोठा, गांझी भोयरे, पठारवाडी, आळकुटी, रांजणगाव मशीद, रुई छत्रपती, आस्तगाव, सुपा
कर्जत (१)- कुंभळी
श्रीगोंदा (९) - लिंपणगाव, वडाळी, वडघूळ, आढळगाव, राजापूर, येवती, येळपणे, हिंगणी दुमाला
जामखेड (५) - पिंपळगाव उंडा, बांधखडक, दिघोळ, खर्डा, आरणगाव, घोडेगाव
शेवगाव (१) - चेडे चांदगाव
पाथर्डी (१२) - अकोला, मोहज देवढे, माणिकदौंडी, एकनाथवाडी, चिंचपूर इजदे, येळी, जांभळी, आडगाव, कासार पिंपळगाव, खरवंडी, जोड मोहोज, चितळी
राहाता (२)- लोणी खुर्द, हनुमंतगाव
कोपरगाव (१) - रवंदा
----------
आचारसंहिता भंगाच्या दोनच तक्रारी
ग्रामपंचायत निवडणुकीची यंत्रणा पार पाडणाऱ्या महसूल विभागाकडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आचारसंहिता भंग झाल्याच्या केवळ दोनच तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी निकालीही काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.
----