नगर जिल्ह्यात ५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; ४ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:28 PM2020-07-24T12:28:18+5:302020-07-24T12:29:02+5:30

अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी (२४ जुलै) ५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत चारने वाढ झाली आहे. 

53 patients discharged in Nagar district; The number of new corona patients increased | नगर जिल्ह्यात ५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; ४ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले

नगर जिल्ह्यात ५३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; ४ नवे कोरोनाचे रुग्ण वाढले

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी (२४ जुलै) ५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत चारने वाढ झाली आहे. 

 जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १२८७ इतकी झाली आहे. एकूण रुग्ण संख्या २७७५ इतकी झाली आहे. शुक्रवारी  बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी १, जोर्वे १, शहरातील अभंग मळा १, अशोक चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.  

Web Title: 53 patients discharged in Nagar district; The number of new corona patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.