कोरोनाच्या ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:11 AM2020-08-08T11:11:10+5:302020-08-08T11:12:25+5:30
अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार १६५ इतकी झाली आहे. दरम्यान, शनिवारी ५३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार १६५ इतकी झाली आहे. दरम्यान, शनिवारी ५३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ८६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा १.