मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:54 PM2019-06-18T16:54:56+5:302019-06-18T17:00:59+5:30

मुळा धरणात सध्या पिण्यासाठी केवळ ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ पावसाळा लांबल्याने मुळा धरण खपाटीला गेले आहे.

 547 million cubic feet water stock for drinking water in Mula dam | मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

राहुरी : मुळा धरणात सध्या पिण्यासाठी केवळ ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ पावसाळा लांबल्याने मुळा धरण खपाटीला गेले आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उजव्या कालव्यातून २० जून रोजी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण असलेल्या मुळा धरणात सध्या मृत साठ्यासह ५ हजार ४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़ ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा मृत आहे़ पिण्यासाठी व बाष्पीभवनासाठी पाणी वापर होणार आहे़ मागील वर्षी याच कालावधीत पाण्याचा साठा २९५ दशलक्ष घनफूट इतका होता़
मुळा उजव्या कालव्यातून सुटणारे पिण्याचे आवर्तन २० जून ते १५ जुलै यादरम्यान सुरू राहणार आहे़ १५ दिवसांच्या कालावधीत पिण्यासाठी १२५ ते १४० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येणार आहे़
यंदा मुळा धरणातून जायकवाडीसाठी १९०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे लाभक्षेत्राखालील शेतीसाठी पाणी यंदा अपुरे पडले. गेल्या वर्षी तांत्रिकदृष्ट्या मुळा धरण भरले होते़ मात्र पूर्ण क्षमतेने मुळा धरण भरले नव्हते़
मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक कधी होते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे़ पाऊस झाला नसल्याने अजून नव्याने पाण्याचे आवक सुरू झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे़आवर्तन काळात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे़ गरज पडल्यास पोलीस बंदोबस्तही घेण्यात येणार आहे़ पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कर्मचा-यांचे पाच विभागात सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे़ -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.

Web Title:  547 million cubic feet water stock for drinking water in Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.