जामखेडमध्ये ४९ ग्रामपंचायतसाठी ५८१ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:40+5:302020-12-30T04:28:40+5:30
जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा विक्रम नोंदविला गेला. मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ४४३ अर्ज ...
जामखेड : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा विक्रम नोंदविला गेला. मंगळवारी एकाच दिवसात विक्रमी ४४३ अर्ज दाखल झाले. तर मंगळवारअखेर एकूण अर्जसंख्या ५८१ वर पोहोचली. उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, उमेदवारी अर्ज सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, सोमवारी १२८ तर मंगळवार रोजी ४४३ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त ५६ अर्ज खर्डा ग्रामपंचायतसाठी दाखल झाले आहेत, तर त्या खालोखाल अरणगावसाठी २२ अर्ज दाखल झाले आहेत. दत्त जयंती मुहूर्तावर मंगळवारी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्ज असल्याने इच्छुक रात्र जागून काढून उमेदवारी अर्ज भरत आहेत. मंगळवार रोजी गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे- अरणगाव २२, मोहा १४, साकत २१, जवळके १५, सोनेगाव ७, घोडेगाव १६, बोर्ले ११, चोंडी १७, धानोरा १७, मोहरी ४, सावरगाव ८, पिंपळगाव आळवा ८, खांडवी १६, बावी २, कवडगाव ८, डोणगाव १२, नाहुली ९, पिंपळगाव उंडा १४, गुरेवाडी ४, पिंपरखेड ३, धामणगाव ६, दिघोळ ११, बाळगव्हाण ५, आनंदवाडी ५, धोंडपारगाव ६, लोणी ८, कुसडगाव १५, तरडगाव १०, सातेफळ ५, पाटोदा २५, बांधखडक १५, नायगाव ३, तेलंगसी ६, नान्नज १३, खर्डा ५६, पाडळी १०, खुरदैठण ३, चोभेवाडी ४, पोतेवाडी ७ असे एकूण ४४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
..............
अर्ज भरण्याची वेळ ५ पर्यंत वाढवली
ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किचकट प्रक्रिया व सर्व्हर डाऊनमुळे अर्ज दाखल करण्यास वेळ लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदर परिस्थिती पाहून बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवली असून, ती तीनऐवजी सायंकाळी साडेपाचपर्यंत केली आहे. उमेदवारी अर्ज व जातपडताळणी अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन स्वीकारले जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली.