कोरोना बाधिताच्या संपर्कातील ६ जण निगेटिव्ह; बोधेगावातील ७ वर्षीय चिमुरडीही निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 02:41 PM2020-06-06T14:41:05+5:302020-06-06T14:41:51+5:30
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे कल्याणहून एका रात्रीसाठी आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील ५ जणांना तपासणीसाठी गुरूवारी (दि.४ जून) जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तसेच बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी रात्री उशीरा या ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिरानी यांनी दिली.
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे कल्याणहून एका रात्रीसाठी आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील ५ जणांना तपासणीसाठी गुरूवारी (दि.४ जून) जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते. तसेच बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. शुक्रवारी रात्री उशीरा या ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिरानी यांनी दिली.
कल्याणहून विनापरवानगी राणेगावात आलेल्या दुसºया ३२ वर्षीय तरूणाचा अहवाल बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच गुरूवारी तहसीलदार अर्चना पागिरे, पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिरानी यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी राणेगावात दाखल झाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कोरोनाबाधित तरूणाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन माहिती संकलित करण्यात आली.
दरम्यान रूग्ण वास्तव्यास असलेल्या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. घरोघरी जाऊन प्रशासनाने सारी, इली, आरी आजाराबाबात सर्वेक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. रूग्णाच्या ‘हायरिस्क’ संपर्कात आलेल्या कुटूंबातील ५ जणांना तपासणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते. बोधेगाव येथील एक ७ वर्षीय चिमुरडीलाही तपासणीसाठी पाठविले होते. या ६ जणांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.