मुळा धरणात ६३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:41 PM2018-08-13T16:41:14+5:302018-08-13T16:41:18+5:30

मुळा धरण आज ६३ टक्के भरले़ पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू झाल्याने आवक ६ हजार ५९२ क्युसेकसने सुरू असूनदोन्ही कालव्याचे आवर्तन सुरू असतांनाही पाण्याची पातळी स्थिर आहे.

63% water storage in Mula dam | मुळा धरणात ६३ टक्के पाणीसाठा

मुळा धरणात ६३ टक्के पाणीसाठा

राहुरी : मुळा धरण आज ६३ टक्के भरले़ पाणलोट क्षेत्रावर पाऊस सुरू झाल्याने आवक ६ हजार ५९२ क्युसेकसने सुरू असूनदोन्ही कालव्याचे आवर्तन सुरू असतांनाही पाण्याची पातळी स्थिर आहे.
२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १६ हजार २७० दलघफु पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ११ हजार ७७७ दलघफु इतक ा आहे. कोतुळ येथे ६ मिली पाऊस पडला़ यंदाच्या पावसाळयात कोतुळ येथे २२० मिली पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे २ मिली पावसाची नोंद झाली आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्याने ६ हजार ५९२ क्युसेकसने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी १ हजार ६५२ क्युसेकसने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. डाव्या कालव्यातून ३०० क्युसेकसने आवर्तन सुरू आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्याने पाण्याची आवक सुरू आहे.
 

Web Title: 63% water storage in Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.