६३ वर्षीय कलाकाराचा जीवन संघर्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:52+5:302021-05-29T04:16:52+5:30
डिजिटल फ्लेक्सच्या जमान्यातदेखील या कलाकाराने भिंतीवर अक्षर लेखन कला जपली आहे. लाॅकडाऊनच्या काळात मंदिरांच्या कमानी, ग्रामपंचायत कार्यालये, सरकारी ...
डिजिटल फ्लेक्सच्या जमान्यातदेखील या कलाकाराने भिंतीवर अक्षर लेखन कला जपली आहे. लाॅकडाऊनच्या काळात मंदिरांच्या कमानी, ग्रामपंचायत कार्यालये, सरकारी योजनांतील बांधकामे यांच्या रंगरंगोटीसह त्यावर फलक माहिती लेखन व साईन बोर्ड रंगवणे काम सुरू आहे. बऱ्याच इमारती त्यांनी रंगविल्यामुळे लाॅकडाऊन या पेंटरसाठी इष्टापत्ती ठरली आहे.
कोतुळ परिसरातील शिक्षकाचा मुलगा अशोक शेळके हे १९७५ला दहावी नापास झाला. या निराशेपोटी त्याने घर सोडले व पायी बोटा नारायणगाव(पुणे) गाठले. येथे कोते पेंटर त्यांना गुरू म्हणून भेटले. या कोते यांचे मूळ गाव कोतुळच. यांचे नुकतेच कोरोना काळात निधन झाले आहे. कोते यांच्याकडे अक्षर लेखन, चित्र रंगविणे, मंदिर इमारती रंगकाम याचे धडे शेळके यांनी गिरविले. कलेचे धडे गिरवून जुजबी चित्रकलेचे ज्ञान मिळवून ते कोतुळ येथे आले. कोतुळ परिसर आणि सातेवाडी परिसरातील आदिवासी डांगाण भाग त्याचे कार्यक्षेत्र बनले. येथील अनेक गावात भिंती अक्षरांच्या माध्यमातून त्यांची कला गावपारावर पोहचली. चावडी गावपारावरील गप्पांमुळे त्यांची कानोकानी त्यांची जाहिरात झाली.
४६ वर्षे शेळके हे हातात कुंचला घेऊन कलेची साधना करत आहेत. डिजिटल व फ्लेक्सचा जमाना आला आणि हाताने रंगकाम करणाऱ्या कलाकारांच्या उपासमारीचा, आर्थिक अडचणीचा काळ सुरू झाला. काहींनी व्यवसाय मार्ग बदलले. कुंचला घेऊन त्यांनी रंगकामात गुंतवून घेतले. वयाच्या त्रेसष्टीत ते उंच कमानीवर सुरेख अक्षरे रंगवत आहेत. चित्रकलेचे कोणतेच शिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या बळावर कला जोपासत आहे. लाॅकडाऊनमध्ये फ्लेक्स मर्यादा आल्या आणि ग्रामीण भागात त्यांना काम करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे.
सोबत फोटो..