अहमदनगरमधील ६७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाबाधितांची संख्या ६९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:40 PM2020-05-21T20:40:24+5:302020-05-21T20:46:26+5:30
अहमदनगर : शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका ६७ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते.
अहमदनगर : शहरातील रामचंद्र खुंट परिसरातील एका ६७ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेने एका खाजगी रुग्णालयात उपचार करून घेतले होते.
खासगी रुग्णालयाने तिचा स्त्राव तपासणीसाठी खाजगी मान्यताप्राप्त लॅबकडे पाठवला होता. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत व्यक्तींची संख्या ६९ झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता सहा झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, या महिलेच्या निकट सहवासितांचे स्वॅब घेण्यात येत असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये समावेश झाला होता. त्यामुळे शुक्रवारपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत बससेवाही सुरू झाली आहे. मात्र हा निर्णय झाल्यानंतर काही क्षणातच बुधवारी दोन रुग्ण वाढले. त्यात गुरुवारी एक महिला कोरोनाबाधित आढळून आली आणि त्यातच तीचा मृत्यू झाल्याने नगरमधील नागरिक धास्तावले आहेत.