समता पतसंस्थेच्या ठेवीत ६८ कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:19 AM2021-04-02T04:19:58+5:302021-04-02T04:19:58+5:30
कोयटे म्हणाले, संस्थेने ३१ डिसेंबर २०२० ला १ हजार कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करून महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळविला ...
कोयटे म्हणाले, संस्थेने ३१ डिसेंबर २०२० ला १ हजार कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करून महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळविला आहे. विशेषतः कर्ज वाटपापैकी सोनेतारण कर्ज १०० कोटी रुपयांचे आसपास जाऊन पोहोचले आहे. समता पतसंस्थेने वेअर हाऊस कर्ज २७ कोटी तसेच अतिशय नगण्य थकबाकी असलेले मायक्रो फायनान्समध्ये २५ कोटी कर्ज वाटप केले आहे. समता पतसंस्थेने वेअर हाऊस कर्ज २७ कोटी तसेच अतिशय नगण्य थकबाकी असलेले मायक्रो फायनान्समध्ये २५ कोटी कर्ज वाटप केले आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक १७५ कोटी ८० लाख असून गुंतवणूक, सोनेतारण, वेअर हाऊस कर्ज, मायक्रो फायनान्स हे कधीही उपलब्ध होणारे कर्ज एकूण ३२८ कोटी रुपये आहे. एकूण कधीही उपलब्ध होणारे कर्ज गुंतवणुकीचे प्रमाण ५५ टक्के इतके आहे.
काका कोयटे म्हणाले, केवळ कर्ज वाटप न करता मायक्रो फायनान्सने दिलेल्या महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या स्वदेशी उत्पादनास भारतभर ऑनलाईन विक्री करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने सहकार उद्यमीच्या माध्यमातून ‘कॉप शॉप वर्ल्ड’ अंतर्गत स्थानिक तसेच स्वदेशी उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून विक्रीस प्रारंभ केला आहे. ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा, उपाध्यक्ष श्वेता भरत अजमेरे, समताचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड, वसुली अधिकारी जनार्दन कदम यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून पुरवली.