जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण गेले घरी, केवळ ३२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 12:26 PM2020-07-07T12:26:11+5:302020-07-07T12:26:38+5:30

अहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

68% patients in the district went home, only 32% patients started treatment | जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण गेले घरी, केवळ ३२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यातील ६८ टक्के रुग्ण गेले घरी, केवळ ३२ टक्के रुग्णांवर उपचार सुरू

सुदाम देशमुख
अहमदनगर : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५४ टक्के आहे. नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे गेल्या महिन्यात ८० टक्क्यांच्या पुढे होते. मात्र गत आठवड्यापासून रोज २० ते २५ रुग्ण वाढत आहेत. तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी सोडले जात आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ६८ टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात रुग्णांवर तत्काळ उपचार मिळत असल्याने बरे होणाºया रुग्णांची संख्या ही समाधानकारक असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात पहिला रुग्ण १२ मार्चला आढळला. त्यानंतर रोज एक ते दोन रुग्ण जिल्ह्यात आढळून यायचे. त्याची संख्या आता थेट २५ ते ४१ पर्यंत गेली आहे. सुरवातीच्या काळात १४ दिवसानंतर रुग्णाला बरे झाल्यानंतर सोडले जात होते. आता आठ ते दहा दिवसांनी रुग्ण बरे होत असून त्यांना घरी सोडले जात आहे. सरासरी रोज वाढणाºया रुग्णांची संख्या ही २५ असली तरी रोज सरासरी १५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले जात आहे. जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे रुग्णांवर उपचार करण्यात येत असून काही रुग्ण सध्या इतर जिल्ह्यातही उपचार घेत आहेत.
--------------------
रुग्ण बरे होण्याची स्थिती
तारीख           एकूण बाधित    बरे झालेले रुग्ण     टक्केवारी
६ जून            २०७                         १०९                ५२.६५
१३ जून        २५१                          १९८                ७८.८८
२० जून       २८२                            २३७               ८४.०४
२७ जून       ३९७                              २७३             ६८.७६
४ जुलै       ५४४                              ३६९               ६७.८३
०५ जुलै      ६१८                             ४००                ६४.७२
(रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण-६८.८३ टक्के)
-----------------
राज्याची स्थिती
दिवस        रुग्ण बरे
६ जून        ४५.०६ टक्के
१३ जून    ४७.२० टक्के
२० जून    ५०.९४ टक्के
२७ जून    ५२.९४ टक्के
४ जुलै     ५४.०२ टक्के
----------------

राज्यापेक्षा १४ टक्क्यांनी प्रमाण अधिक
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४ टक्के आहे, तर नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६८ टक्के आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ही २ लाख ६४ हजार इतकी आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ८२ रुग्ण घरी (दि. ४ जुलैचे आकडे) गेले आहेत. ही संख्या मोठी असल्याने प्रमाण हे कमी दिसत असले तरी राज्यापेक्षा नगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे १४ टक्क्यांनी अधिक आहे. लवकर निदान, उपचारांचे बदलते प्रोटोकॉल, मृत्युदरात घट, रुग्णाचे मानसिक बळ यामुळे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या जिल्ह्यात ६३८ इतके एकूण रुग्ण आहेत, तर जिल्ह्यात बरे होणाºया रुग्णांची संख्या ४०० इतकी झाली आहे.
--------------
कोठे आहेत रुग्ण
जिल्हा रुग्णालय- २६०
एम्स हॉस्पिटल-१५
जिल्हा रुग्णालय आयसीयू-८
बूथ हॉस्पिटल-९७
प्रवरा ट्रस्ट, लोणी-१०
साई संस्थान, शिर्डी-३
एसएसजीएम, कोपरगाव-६
ग्रामीण रुग्णालय, संगमनेर-१६
नाशिक जिल्हा रुग्णालय-१
वडाळा महादेव (श्रीरामपूर) रुग्णालय-६
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे- २
ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल, मुंबई-२
संगमनेर खासगी हॉस्पिटल- २
पारनेर खासगी हॉस्पिटल-१
नाशिक येथील खासगी हॉस्पिटल-५
-----------------
उपलब्ध सुविधा
आतापर्यंत घेतलेले सॅम्पल-६१७२
आतापर्यंत पॉझिटिव्ह- ६३८
आतापर्यंत निगेटिव्ह- ५२४२
घरी सोडलेले -४००
चाचणीस नकार -४४
बेडची संख्या-८९०
विलगीकरणाची ठिकाणे- ४ 
क्वारंटाईनची ठिकाणे-२८
क्वारंटाईन रुग्ण-३२९५
होम क्वारंटाईन-१४७५
संस्थात्मक क्वारंटाईन-६९३
इतर क्वारंटाईन-२६०
दुसºयांदा पॉझिटिव्ह रुग्ण-१२

Web Title: 68% patients in the district went home, only 32% patients started treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.