नेवाशातून ६८४ अर्ज; उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाणारांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:29 PM2020-05-04T18:29:41+5:302020-05-04T18:30:23+5:30

प्रशासनाने राज्यासह देशात विविध ठिकाणी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर निवारा केंद्र व नेवासा तालुक्यातील विविध भागात असलेल्या ६८४ नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती रविवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

684 applications from Nevasa; The number of people going to Uttar Pradesh and Madhya Pradesh is more | नेवाशातून ६८४ अर्ज; उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाणारांची संख्या अधिक

नेवाशातून ६८४ अर्ज; उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाणारांची संख्या अधिक

नेवासा : प्रशासनाने राज्यासह देशात विविध ठिकाणी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर निवारा केंद्र व नेवासा तालुक्यातील विविध भागात असलेल्या ६८४ नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती रविवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.
नेवासा तालुक्यात करोनाचे चार रुग्ण निघाल्यानंतर प्रशासनाने योग्य ते नियोजन केल्याने किमान करोनाची तालुक्यात तरी साखळी तुटल्याचे जाणवते आहे. पायी येणाºया नागरिकांसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावर वडाळा बहिरोबा व प्रवरासंगम या ठिकाणी निवारा केंद्रे उघडली आहेत. आम्हाला घरी जाऊ द्या.. अशीच मागणी या कामगार मजुरांची आहे. सध्या निवारा केंद्रात असलेली १३९ तसेच निवारा केंद्र सोडून इतर ठिकाणी राहत असलेले ५४५ जणांनी व १३९ असे एकूण ६८४ व्यक्तींनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांमध्ये उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशकडे जाणाºयांची संख्या अधिक आहे. राज्यातील १९ ठिकाणी जाण्यासाठी नागरिक तालुक्यात अडकून पडले आहेत. निवारा केंद्रातील ७५ जणांना ७ राज्यात जायचे आहे. तर ३९८ व्यक्तींना दहा विविध राज्यात प्रस्थान करायचे आहे. निवारा केंद्रे उघडली असली तरी थांबलेले नागरिक थांबायला तयार नाहीत. आम्हाला काही नका देऊ. फक्त घरी जाऊ द्या, अशीच आर्त मागणी अधिकाºयांना करीत आहेत, असेही तहसीलदार सुराणा यांनी सांगितले. 

Web Title: 684 applications from Nevasa; The number of people going to Uttar Pradesh and Madhya Pradesh is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.