ग्रामीण रुग्णालयास ७० कचरा पेट्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:22 AM2021-05-26T04:22:01+5:302021-05-26T04:22:01+5:30

रुग्णालय व वसतिगृह येथे रुग्णांना कचरा पेट्यांची आवश्यकता होती. ती टीम कोविडने पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडले आहे. ...

70 litter bins donated to rural hospitals | ग्रामीण रुग्णालयास ७० कचरा पेट्यांची भेट

ग्रामीण रुग्णालयास ७० कचरा पेट्यांची भेट

रुग्णालय व वसतिगृह येथे रुग्णांना कचरा पेट्यांची आवश्यकता होती. ती टीम कोविडने पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडले आहे. शहर व तालुक्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये तीन महिन्यांपासून टीम कोविड केअर सामाजिक भान ठेवून कार्य करत आहे. सुरुवातीच्या अटीतटीच्या काळात रुग्ण प्राथमिक स्तरावर असताना त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यापासून ते दुर्दैवाने मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यापर्यंत काम करत आहेत. जनजागृतीसाठी तालुक्यात रिक्षावर स्पीकर लावून माहिती देणे तसेच स्वच्छतेसाठी कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांची स्वखर्चाने नियुक्ती या टीमने केली आहे. समिन बागवान, जीवन सुरुडे, शरिफ शेख, चंदू मारे, नईम शेख, रवी त्रिभुवन, अकबर पठाण, श्रीकृष्ण बडाख, जावेद पठाण, फैय्याज इनामदार, मेहबूब प्यारे आदी कार्यरत आहेत.

Web Title: 70 litter bins donated to rural hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.