दुकानात विसरलेले ७० हजार केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:44+5:302021-03-25T04:20:44+5:30
वैभव शेळके कर्जतहून उपचारासाठी तारकपूर बस स्थानकासमोर डॉ. कथुरिया यांच्याकडे सकाळी आले होते. औषध घेण्यासाठी ते आनंद मेडिकल अॅण्ड ...
वैभव शेळके कर्जतहून उपचारासाठी तारकपूर बस स्थानकासमोर डॉ. कथुरिया यांच्याकडे सकाळी आले होते. औषध घेण्यासाठी ते आनंद मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्समध्ये आले. मात्र, त्यांची एक पिशवी दुकानात राहिल्याचे मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ती पिशवी उघडली असता त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात डॉ. कथुरिया यांना सांगितले. मात्र, शेळके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दुपारी उशिरा शेळके यांना पिशवी हरवल्याची जाणीव झाली. ते पिशवी शोधत मेडिकल स्टोअर्समध्ये आले असता आनंद धोका यांनी त्यांची ओळख पटवून पैशांची पिशवी डॉ. कथुरिया यांच्या हस्ते परत दिली. मेडिकल चालकाचा प्रामाणिकपणा पाहून शेळके भारावले. त्यामध्ये ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगून पैशांची पिशवी परत दिल्याबद्दल आभार मानले.
...............
फोटो : २४ मेडिकल
तारकपूर बस स्टॅण्डसमोर मेडिकल दुकानात विसरलेली पैशांची पिशवी मेडिकलचे संचालक आनंद तेजमल धोका यांनी प्रामाणिकपणा दाखवित डॉ. कथुरिया यांच्या हस्ते वैभव शेळके यांना परत केली.