नगरमध्ये एका दिवसात ७९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:43+5:302021-03-04T04:36:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहर व परिसरात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ७९ रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहर व परिसरात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ७९ रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चारशेवर पोहोचल्याने शहरातील हॉटेल नटराज व जैन पितळे बोर्डिंग ही दोन्ही कोविड केअर सेंटर बुधवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहर व परिसरातील कोरोना रुग्णांनी २२ हजारांचा टप्पा ओलंडला आहे. सध्या ४०० रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २० फेब्रुवारीमध्ये दररोज रुग्ण संख्येत ४ ते ५ ने वाढ होत होती. काल, सोमवारी ४४ रुग्णांचे निदान झाले. मंगळवारी ३२ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७९ इतकी झाली आहे. गेल्या आठ दिवसांतील ही सर्वांत मोठी रुग्ण संख्या आहे. महापालिकेने कोराना लसीकरणासाठी मोहीम हाती घेतली असून, सात उपकेंद्रांत डोस दिला जाणार आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने पहिल्या टप्प्यात हॉटेल नटराज व जैन पितळे बोर्डिंग येथील कोविड केअर सेंटर बुधवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड सेंटरसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. हे कर्मचारी कोविड केअर सेंटरमध्ये हजर होणार असून, या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना प्रवेश दिला जाणार आहे.
...
कोविन पोर्टल दुपारनंतर झाले सुरू
कोरोनावरील लसीकरणासाठी ज्या पोर्टलवर नावनोंदणी करायची आहे, ते कोविन पोर्टल सोमवारी दिवसभर बंद होते. ते मंगळवारी दुपारनंतर सुरू झाले असून, नागरिकांना त्यावर नोंदणी करता येणार आहे. मनपाच्या सात उपकेंद्रांतही नावनोेंदणी करून घेतली जाणार असून, खासगी पाच रुग्णालयांतही ही सुविधा उपलब्ध आहे. नावनोंदणी करून डोस दिला जाणार आहे.