काय थट्टा लावली राव! विम्यासाठी भरले ८० रु., भरपाई मिळाली ५ रु.; शेतकरी कोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:23 AM2022-11-02T06:23:16+5:302022-11-02T06:23:23+5:30

सोयाबीनचे १००% नुकसान

80 rps paid for insurance, received compensation Rs.5 rps; Farmers will go to court | काय थट्टा लावली राव! विम्यासाठी भरले ८० रु., भरपाई मिळाली ५ रु.; शेतकरी कोर्टात जाणार

काय थट्टा लावली राव! विम्यासाठी भरले ८० रु., भरपाई मिळाली ५ रु.; शेतकरी कोर्टात जाणार

- नितीन गमे

अस्तगाव (जि. अहमदनगर) : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत राहाता तालुक्यातील केलवड येथील बाबूराव सावळेराम गमे या शेतकऱ्याला एका गुंठ्यामागे ५.३८ रुपयाने रक्कम खात्यात जमा झाली. 

विमा काढताना कंपनीने शेतकरी व केंद्र तसेच राज्य सरकारकडून ८० रुपये १६ पैसे गुंठ्याने रक्कम जमा केली. असाच प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला. सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले कंपनीने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. 

अनेक गावांत शेतकऱ्यांकडून विमा कंपनीने प्रतिगुंठा ५, ३८, ४३, ५६, ७०, ९०, १०० ते १३० अशी सरासरी रक्कम जमा केली. अतिपावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असताना केवळ नगण्य रक्कम का दिली, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.  

मदतीची अपेक्षा, परंतु भ्रमनिरास 

एका गुंठ्यामागे शेतकऱ्यांकडून ११ रु. ४५ पैसे व सरकारकडून ६८ रु. ७१ पैसे भरलेले असतात. केलवडचे शेतकरी बाबूराव सावळेराम गमे यांनी २ हेक्टर ६१ आरवर विमा उतरविला होता, १०० टक्के नुकसान होऊनही त्यांना फक्त १,४०६ रु. खात्यात वर्ग केल्यामुळे शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

Web Title: 80 rps paid for insurance, received compensation Rs.5 rps; Farmers will go to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.