शेवगावच्या आठ हजार शेतक-यांची दिवाळी गोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:06 PM2018-11-06T13:06:49+5:302018-11-06T13:06:52+5:30

शेवगाव : कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी तिसºया टप्प्यात शेवगाव तालुक्यासाठी ५ कोटी १५ लाख २७ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त ...

8000 farmers of Shevgaon, Diwali sweet! | शेवगावच्या आठ हजार शेतक-यांची दिवाळी गोड!

शेवगावच्या आठ हजार शेतक-यांची दिवाळी गोड!

शेवगाव : कपाशीवरील बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी तिसºया टप्प्यात शेवगाव तालुक्यासाठी ५ कोटी १५ लाख २७ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शेतक-यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची ही रक्कम तातडीने वर्ग करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली. त्यामुळे तालुक्याच्या १६ गावातील ८ हजार १२७ शेतकºयांची दिवाळी गोड होणार आहे.
कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी नुकसान झालेल्या कपाशी पिकासाठी शेवगाव तालुक्यातील शेतकºयांसाठी ४१ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ५३ गावातील १६ हजार ३५३ शेतकºयांना ८ कोटी ७४ लाख ८७ हजार ८३६ रुपये तर दुसºया टप्प्यात ५२ गावातील २२ हजार ३१ शेतकºयांना १३ कोटी १२ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान यापूर्वीच देण्यात आले आहे.
आता तिसºया टप्प्यात १६ गावातील शेतकºयांना तसेच अनुदानापासून वंचित राहिलेल्या एकूण ३५ गावातील शेतकºयांना अनुदान रकमेचे वाटप करण्यात येणार असल्याचे भामरे यांनी सांगितले. नायब तहसीलदार मयूर बेरड, अशोक नरोड, संतोष गर्जे आदी महसूल कर्मचाºयांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याने शेतकºयांची दिवाळी गोड होणार आहे.
तालुक्यातील गोळेगाव, कोनोशी, शेकटे खुर्द, शिंगोरी, हातगाव, एरंडगाव, अधोडी, राणेगाव, शोभानगर, सेवानगर, जोहरापूर, गायकवाड जळगाव, नागलवाडी, कांबी, खामगाव, हिंगणगाव येथील शेतकºयांसह अनुदानापासून वंचित राहिलेल्या इतर ३५ गावातील शेतकºयांनाही अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे.

Web Title: 8000 farmers of Shevgaon, Diwali sweet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.