८२९ नवे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:58+5:302021-03-27T04:21:58+5:30

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०४ आणि अँटिजेन चाचणीत २२० रुग्ण बाधित आढळले. ...

829 new patients were added | ८२९ नवे रुग्ण वाढले

८२९ नवे रुग्ण वाढले

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०४ आणि अँटिजेन चाचणीत २२० रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ९०, अकोले १, जामखेड १, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण ५, नेवासा १३, पारनेर १०, पाथर्डी १, राहुरी २, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर ४ आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १२४, अकोले ४, जामखेड २, कर्जत २, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ४१, नेवासा १२, पारनेर २१, पाथर्डी ४, राहाता ७०, राहुरी १२, संगमनेर ३३, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ४०, कॅन्टोन्मेंट ८ आणि इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज २२० जण बाधित आढळले. मनपा २५, अकोले २२, जामखेड १, कर्जत ३०, कोपरगाव १, नगर ग्रामीण २८, नेवासा २७, पारनेर १७, पाथर्डी २४, राहाता १२, राहुरी १६, संगमनेर ०४, शेवगाव १, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-----------_

---------------

उपचार सुरू असलेले रुग्ण : ४९८५

मृत्यू : ११८९

एकूण रुग्णसंख्या : ८८९१३

Web Title: 829 new patients were added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.