राळेगणसिद्धीत ८३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:52+5:302021-01-16T04:24:52+5:30
पारनेर : तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी ८३ टक्के मतदान झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील जिल्हा ...
पारनेर : तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी ८३ टक्के मतदान झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर सकाळी मतदान केले.
आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नाने बिनविरोध निवडणूक होण्यासाठी माजी सरपंच जयसिंग मापारी व माजी उपसरपंच लाभेष औटी यांचे दोन्ही गट एकत्र येऊनही काही अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्याने राळेगणसिद्धी ग्रामपंचायत बिनविरोध होऊ शकली नव्हती. निवडणुकीत नऊ सदस्यांपैकी फक्त दोन उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरित सात सदस्यांच्या निवडीसाठी शांततेत एकूण ८३.०१ टक्के मतदान झाले.
मतदान केल्यानंतर हजारे म्हणाले, मतदाराला मिळालेला मतदानाचा हक्क मूलभूत व सर्वश्रेष्ठ असा हक्क आहे. सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी राज्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदारांनी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान केले पाहिजे.
फोटो : १५ अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला.