जामखेडमध्ये तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 09:13 PM2017-10-07T21:13:21+5:302017-10-07T21:13:21+5:30
जामखेड (अहमदनगर): तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिवूर या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान झाले. तीनही ग्रामपंचायत मध्ये ...
जामखेड (अहमदनगर): तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिवूर या तीन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान झाले. तीनही ग्रामपंचायत मध्ये सरासरी ८४ टक्के मतदान झाले.
रत्नापूर, राजुरी व शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हे तीनही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रत्नापूर ग्रामपंचायतसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय वारे व विद्यमान पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत मोरे यांच्या दोन गटात सरळ लढत होत आहे. सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. शिवूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण ८५ टक्के मतदान झाले.
राजुरी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गणेश कोल्हे व सुभाष काळदाते यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. तर नऊ जागेसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. सरासरी ८४ टक्के शांततेत मतदान झाले.