पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात उभी राहणार ८४० घरकुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 07:30 PM2018-06-08T19:30:54+5:302018-06-08T19:31:49+5:30
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. बाबासाहेब वाकळे यांनी विषय सभेत विषय मांडला. या विषयाला स्थायीच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.
अहमदनगर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात ८४० घरकुले बांधली जाणार आहेत. या योजनेसाठी महापालिकेच्या स्थ्यायी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही मंजुरी देण्यात आली. बाबासाहेब वाकळे यांनी विषय सभेत विषय मांडला. या विषयाला स्थायीच्या सर्व सदस्यांनी मंजुरी दिली.
स्थायी समितीच्या सभेत पंतप्रधान आवास योजनेतील घटक क्रमांक २ अंतर्गत महापालिकेमार्फत राबविण्यात येणा-या ८४० घरांच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती करणे, व त्यास खर्चास मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत २ सविस्तर असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. केडगाव येथील देवी मंदिराच्या मागील साडेसहा एकरावर ६२४ घरे उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी ४६ कोटी रुपये खर्च येणार आहे. तर दुसरा प्रकल्प काटवन खंडोबा येथे उभारला जाईल. या ठिकाणी २१६ घरे बांधली जाणार आहेत. या घरांसाठी १९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही घरकुले उभी राहिल्यानंतर सोडत पध्दतीने त्यांचे वाटप केले जाणार आहे. या घरकुलांसाठी आतापर्यत महापालिकेकडे ८ हजार ९४० अर्ज दाखल झाले आहेत. हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.