राहाता तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 09:29 PM2017-10-07T21:29:12+5:302017-10-07T21:29:18+5:30

राहाता तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाले.नांदुर्खी बुद्रुक येथील किरकोळ वादावादी वगळता. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पडली.

85 percent polling for eleven gram panchayats in Rahata taluka | राहाता तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान 

राहाता तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के मतदान 

लोकमत न्यूज नेटवर्क
राहाता :  राहाता तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाले.नांदुर्खी बुद्रुक येथील किरकोळ वादावादी वगळता. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया सुरळित पार पडल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माणिकराव आहेर यांनी दिली.
 
तालुक्यातील १२ ग्रामपंचायती पैकी लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरीत ११ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी सोमवारी राहाता तहसील कार्यालयात सुरु होणार आहे.

मतदानाची टक्केवारी 
डोहार्ळे - ९१.७४
नांदुर्खी बुद्रुक -९३.३९
नांदुर्खी खुर्द - ९७.३१
खडकेवाके -९०.४१
सावळिविहीर बुद्रुक -८२.५३
निघोज -८७.१४
साकुरी-७९.६१
न.पा.वाडी - ९४.२६
राजुरी -७८.७४
रांजणखोल -८३.८३
आडगांव बुद्रुक -८८.१२

Web Title: 85 percent polling for eleven gram panchayats in Rahata taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.