८५ वर्षीय आजोबांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:05+5:302021-05-28T04:16:05+5:30
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील श्री खंडेश्वर कोविड सेंटरमधील एका ८५ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. ...
ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील श्री खंडेश्वर कोविड सेंटरमधील एका ८५ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.
दादासाहेब नाथू पवार असे त्यांचे नाव आहे. दादासाहेब पवार यांना सर्दी, ताप, खोकला, धाप अशी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी त्यांना येळपणेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला ऑक्सिजनचे प्रमाण ९१ होते. हे पाहून कोरोना कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचार केले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आणि तेथील सुविधांमुळे ८५ वर्षीय आजोबाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तसेच या कोविड सेंटरमध्ये ४९ रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी १९ कोरोनामुक्त झाले आहेत. या कोविड सेंटर सुरू करण्यासाठी गटनेते सतीश धावडे यांनी पुढाकार घेतला.
ग्रामीण भागात आपल्या जनतेसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ. चेतन साळवे यांना विनंती केली आणि कोविड सेंटर सुरू केले.
यावेळी सतीश धावडे, डॉ. चेतन साळवे, विनोद धावडे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र थोरात, जितू धावडे, प्राचार्य जे. डी. पवार, डी. डी. पवार, टी. डी. पवार, गावडे, नीलेश चौधरी, गणेश थोरात, भाजप विद्यार्थी कार्याध्यक्ष प्रशांत पवार, गणेश डफळ, प्रवीण सांगळे, किरण नितनवरे, ग्रामपंचायत कर्मचारी नीलेश हुलसर, अजय कांबळे, सुनील कोळपे, सर्व कोविड सेंटरचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. रुग्णांना जेवण, गरम पाणी, सकाळी अंडी, नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी व्हेज-नॉनव्हेज जेवणही दिले जाते. उत्कृष्ट पद्धतीने कोविड सेंटरचे नियोजन आहे.
चौकट :-
दर्जेदार आरोग्य सेवा... येळपणे येथील कोविड सेंटर हे सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे.
---
भरमसाठ बिलापासून वाचलो..
तेथील डॉ. चेतन साळवे, स्वयंसेवक यांनी चांगल्या पद्धतीने उपचार केले. सोयी-सुविधांमुळे वातावरण प्रसन्न आहे. खासगी दवाखान्यात भरमसाठ होणाऱ्या बिलापासूनही आम्ही बचावलो, असे उपचारानंतर ठणठणीत झाल्यानंतर दादासाहेब पवार यांनी सांगितले.
---
२७ येळपणे
येळपणे येथे श्री खंडेश्वर कोविड सेंटरमधील काेरोनामुक्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकास घरी पाठविताना आरोग्य कर्मचारी.