८८ लाखांचे नुकसान

By Admin | Published: August 27, 2014 11:05 PM2014-08-27T23:05:51+5:302014-08-27T23:09:47+5:30

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले

88 lakhs losses | ८८ लाखांचे नुकसान

८८ लाखांचे नुकसान

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बुधवारी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे़
अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती़ खरिपाची पिकेही वाया गेली़ जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता़ संगमनेर शहरात सर्वाधिक १४६ मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे संगमनेर शहरातील नाटकी पुनर्वसन वसाहत, अलकानगर, रेहमतनगर,नवीननगर रोड आदी परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी घुसले़ या परिसरातील सुमारे ४०५ कुटुंबीय बेघर झाले़ त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ नागरिकांच्या घरातील अन्न धान्याचे नुकसान झाले आहे़ घरातील कपडे,इतर संसार उपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, गॅस शेगडी आदी वस्तू पाण्यात वाहून गेल्या असून, जिल्हा प्रशासनाकडून याविषयीचा पंचनामा केला असून, त्यामध्ये अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे ८७ लाख ९० हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या आपत्तीग्रस्तांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईविषयीचा प्रस्ताव सादर केला असून, अतिवृष्टीतील मदतीबाबत मार्गदर्शन मागविले आहे़ विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संगमनेर शहरातील आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काय आहे अतिवृष्टी
अतिवृष्टीमुळे सलग आठ दिवस घरात पाणी राहिले असेल किंवा घराची पडझड झाली असेल तर ही मदत देण्यात येते़ परंतु संगमनेर शहरात तसे झाले नसून, दुसऱ्या दिवशी पाणी वाहून गेले आहे़ त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना मदत द्यायची किंवा नाही,याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़

Web Title: 88 lakhs losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.