८८ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
By Admin | Published: April 27, 2016 11:49 PM2016-04-27T23:49:18+5:302016-04-27T23:54:36+5:30
अहमदनगर : भारतीय जनता पक्षाची ८८ जणांची ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे.
अहमदनगर : भारतीय जनता पक्षाची ८८ जणांची ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. पालकमंत्री राम शिंदे हे जपान दौऱ्याहून परतल्यानंतर प्रा. बेरड यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. संपूर्ण कार्यकारिणीवर शिंदे यांचीच छाप असल्याचे दिसते.
बुधवारी जाहीर केलेल्या कार्यकारिणीमध्ये १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस, ३२ जिल्हा कार्यकारिणी सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्याला कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. सविस्तर कार्यकारणी अशी: उपाध्यक्ष- राजेंद्र गोंदकर (राहाता),गोरख मुसमाडे (राहुरी), सुभाष दुधाडे (पारनेर), दिलीप लांडे (शेवगाव), सूर्यकांत मोरे (जामखेड), अॅड.युवराज पोटे (नगर), सुनीता अशोक भांगरे (अकोले), सुभाष गायकवाड (राहुरी), डॉ. मृत्युंजय गर्जे (पाथर्डी), सचिन देसरडा (नेवासा). सरचिटणीस, संघटन - प्रकाश चित्ते (श्रीरामपूर-उत्तर जिल्हा), प्रसाद ढोकरीकर (कर्जत-दक्षिण जिल्हा), नितीन कापसे (राहाता), अरुण मुंडे (शेवगाव). चिटणीस- भरत फटांगरे (संगमनेर), संजय सोमवंशी (राहाता), नामदेव खंडाळे (नेवासा), पोपट मोरे (पारनेर), अभिजित कुलकर्णी (श्रीरामपूर),मनिल वायखिंडे (कोपरगाव), नितीन दिनकर (नेवासा), आदिनाथ हजारे (जामखेड), राजेंद्र मोटे (श्रीगोंदा), भूषण बडवे (श्रीगोंदा). कोषाध्यक्ष- अॅड. विवेक नाईक (शेवगाव-नगर). रमेश पिंपळे (कार्यालयीन चिटणीस), श्याम पिंपळे (प्रसिद्धीप्रमुख).
जिल्हा कार्यकारिणी सदस्य- शरद दळवी (नगर), रसिद सय्यद (नगर), वसंतराव चेडे (पारनेर), कृष्णाजी बडवे (पारनेर), राजेंद्र म्हस्के (श्रीगोंदा), दत्तात्रय हिरनवाळे (श्रीगोंदा), आश्राजी टकले (पाथर्डी), सोमनाथ खेडकर (पाथर्डी), कासमभाई शेख (शेवगाव), दिनेश लव्हाट (शेवगाव), डॉ. लक्ष्मण खंडागळे (नेवासा), दिनकर गर्जे (नेवासा), नानासाहेब गागरे (राहुरी), प्रकाश पारख (राहुरी), मारुती बिंगले, गणेश राठी (श्रीरामपूर), बबन मुठे, मुकुंद हापसे (श्रीरामपूर ग्रामीण), बाळासाहेब गाडेकर (राहाता), डॉ. संजय खर्डे (राहाता), महावीर दगडे, सुभाष दवंगे (कोपरगाव), सीताराम मोहारीकर, शिवाजी लष्करे, ज्ञानेश्वर करपे (संगमनेर), विठ्ठल शिंदे (संगमनेर ग्रामीण), सुभाष जायभाय, पोपटराव राळेभात (जामखेड), अॅड.शिवाजी अनभुले,शांतीलाल कोपनर (कर्जत), दिनेश शहा, सोमदास पवार (अकोले).
(प्रतिनिधी)
सचिन तांबे युवा मोर्चाचे अध्यक्ष
युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन तांबे, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तुषार वैद्य, सरचिटणीसपदी बाळासाहेब पोटघन, उपाध्यक्षपदी अनिल ताके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक आहुजा यांची तर अनुसूचित जाती मोर्चा (दलित आघाडी)च्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत काळोखे यांची नियुक्ती करण्यात आली.
२१ निमंत्रित सदस्य
राष्ट्रीय उपाध्यक्ष, पालकमंत्री, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, सभापती, उपसभापती आदी पदाधिकारी कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहणार आहेत. माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अशोक भांगरे, राजेश चौधरी, अॅड. रविकाका बोरावके या ज्येष्ठांना निमंत्रित सदस्य म्हणून मान देण्यात आला आहे.