नगर तालुक्यात सरासरी ८८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:34 PM2017-10-07T20:34:40+5:302017-10-07T20:34:40+5:30

नगर तालुक्यात आज २८ गावांसाठी शांततेत मतदान झाले. सरासरी ८८ टक्के मतदान झाले असून सारोळा कासार, सोनेवाडी, टाकळी येथे किरकोळ वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

88 percent voter turnout in Nagar taluka | नगर तालुक्यात सरासरी ८८ टक्के मतदान

नगर तालुक्यात सरासरी ८८ टक्के मतदान

ठळक मुद्दे सरपंचाची लढाई  : सारोळा सोनेवाडी टाकळीत किरकोळ वादावादी

अहमदनगर : नगर तालुक्यात आज २८ गावांसाठी शांततेत मतदान झाले. सरासरी ८८ टक्के मतदान झाले असून सारोळा कासार, सोनेवाडी, टाकळी येथे किरकोळ वादावादी झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र  परिस्थीती नियंत्रणात आल्याने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सरपंचपदासाठी मोठी चुरस असल्याने एका- एका मतांसाठी संघर्ष पाहावयास मिळाला .


नगर तालुक्यात आज सकाळ पासून उत्साहात मतदानाला सुरूवात झाली. सरपंचपदासाठी प्रथमच मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाल्याने मतदारांमध्ये विशेष कुतुहल होते. मात्र गावांमध्ये यासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने एक एक मत गोळा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती. तहसिलदार सुधीर पाटील व त्यांची यंत्रणा सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होती. पोलिस बंदोबस्त चोख होता.


सारोळा कासार येथे उमेदवारांचे चिन्ह असल्याच्या छोटया चिठठ्या वाटप होत असल्या कारणाने एका गटाने आक्षेप घेत मतदान बंद करण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही गटात जमाव जमा झाल्याने तणाव वाढला . मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थीती नियंत्रणात आली . सोनेवाडी (चास ) व टाकळी खातगाव , नारायण डोहो येथे ही अशाच प्रकारचा तणाव होऊन दोन्ही गट आमने - सामने उभे राहिले . मात्र पोलिसांनी मध्यस्ती करत किरकोळ वाद मिटवले. संवेदनशील वाटणारे वाळकी, नागरदेवळे, नेप्ती, बाबुर्डी बेंद, कापुरवाडी येथे मात्र अनुचित प्रकार घडला नाही.

गावनिहाय टक्केवारी 
दहिगाव - ९२, नागरदेवळे -७५, वाळकी-८१, मदडगाव -९२, बाबुर्डी बेद-९२, सोनेवाडी ( चास ) -८७, सारोळाकासार - ८९, नेप्ती - ९३, कापुरवाडी -८६, सोनेवाडी - ९०, टाकळी खातगाव - ९०.

Web Title: 88 percent voter turnout in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.