८९३ उमेदवारांनी सोडविला पोलिसाचा पेपर

By Admin | Published: April 9, 2017 02:01 PM2017-04-09T14:01:28+5:302017-04-09T14:01:28+5:30

पोलीस शिपाई भरतीत मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या १०९ पैकी ८९३ उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा दिली़

893 candidates withdrew their police policy | ८९३ उमेदवारांनी सोडविला पोलिसाचा पेपर

८९३ उमेदवारांनी सोडविला पोलिसाचा पेपर

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ ९- पोलीस शिपाई भरतीत मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या १०९ पैकी ८९३ उमेदवारांनी रविवारी लेखी परीक्षा दिली़ १२६ उमेदवार गैरहजर राहिले़ येथील वाडियापार्क मैदानात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते़
सकाळी ७ वाजता परीक्षेला प्रारंभ झाला़ पुरूष व महिला उमेदवारांना एकत्रित परीक्षेसाठी बोलविण्यात आले होते़ पोलीस शिपाई पदासाठी नगर जिल्ह्यात असलेल्या ५३ जागांसाठी ७ हजार ७५ अर्ज दाखल झाले होते़ अर्ज केलेल्या पुरू व महिला उमेदवारांची येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मैदानी चाचणी घेण्यात आली़ मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एकास पंधरा या प्रमाणे लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात आले होते़ शंभर गुणाची वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात आली़ येत्या चार ते पाच दिवसांच्या आत लेखी परीक्षेचा निकाल लागून पात्र उमेदवारांची यादी पोलीस मुख्यालयात व पोलीस संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे़ पोलीस मुख्यालयात झालेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती़ रविवारी परीक्षा दिलेल्या ८९३ पैकी ५३ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे़ या प्रक्रियेत कुणाला पोलीस होण्याची संधी मिळते याकडे उमेदवारांचे लक्ष्य लागून आहे़
परीक्षार्थींची धावपळ
लेखी परीक्षा सकाळी ७ वाजता असल्याने वेळेत मैदानात हजर राहण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली़ परीक्षार्थींना सकाळी ६ वाजताच मैदानावर बोलविण्यात आले होते़ त्यामुळे अनेक उमेदवार रात्रीच नगर येथे मुक्कामासाठी आले होते़ तर काहींनी पहाटेच घरातून बाहेर पडत नगर गाठले़

Web Title: 893 candidates withdrew their police policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.