‘नियाेजन’कडे ९ कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:41+5:302021-01-16T04:23:41+5:30
पॅचिंगचा दुसरा टप्पा रखडला अहमदनगर: सावेडी उपनगरातील रस्त्यांतील खड्डे खडी डांबर टाकून बुजविण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी यामुळे ...
पॅचिंगचा दुसरा टप्पा रखडला
अहमदनगर: सावेडी उपनगरातील रस्त्यांतील खड्डे खडी डांबर टाकून बुजविण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी यामुळे चढ झाला असून, तो सपाट करून पुन्हा डांबर टाकले जाणार आहे. परंतु, हे काम रखडल्याने नागिरकांना त्रास हाेत आहे.
....
विद्युत साहित्य वाटप
अहमदनगर : महापालिकेच्या विद्युत विभागाने मागविलेले विद्युत साहित्य प्राप्त झाले होते; परंतु, विद्युत विभाग प्रमुख वैभव जोशी यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे विद्युत साहित्य वाटपाचे काम रखडले होते. जोशी यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, विद्युत साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
....
मनपा इमारत उजळली
अहमदनगर : महापालिकेच्या औरंगाबाद महामार्गवरील नवीन प्रशासकीय इमारतीवरील विद्युत दिवे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले होते. हे दिवे गुरुवारी बसविण्यात आल्याने इमारत परिसरात लखलखाट झाला आहे.
...
महापालिकेत शुकशुकाट
अहमदनगर: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. हे कर्मचारी साहित्य घेऊन गुरुवारी दुपारीच नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यामुळे महापालिकेतील कामकाज दिवसभर ठप्प होते.