देवळालीप्रवराजवळ पकडली १९ लाखांची बनावट दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 07:50 PM2019-09-04T19:50:10+5:302019-09-04T19:51:07+5:30
राज्य उपादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने देवळालीप्रवराजवळ एक पिकअप टेम्पो पकडून १९ लाख ५२ हजार रुपयांची बनावट विदेशी दारु जप्त केली़ यावेळी दोघांना अटक करण्यात आली़ मंगळवाळी रात्री ही कारवाई करण्यात आली़
अहमदनगर : राज्य उपादन शुल्कच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने देवळालीप्रवराजवळ एक पिकअप टेम्पो पकडून १९ लाख ५२ हजार रुपयांची बनावट विदेशी दारु जप्त केली़ यावेळी दोघांना अटक करण्यात आली़ मंगळवाळी रात्री ही कारवाई करण्यात आली़
रिजवान खालीद इनामदार व समीर सांडू शेख (रा़ दोघे कोकणगाव ता़संगमनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ कारवाईदरम्यान या दोघांसोबत असलेला एक जण पसार झाला़ आरोपींकडून नामांकित कंपनीचे नाव वापरून तयार केलेल्या बनावट दारुचे ४५ बॉक्स,एक पिकअप वाहन व एक मारुती सुझुकी इर्टिगा कार जप्त करण्यात आली़
उत्पादन शुल्कचे पोलिस अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर भरारी पथकातील प्रभारी निरिक्षक सुरज कुसळे़ दुय्यम निरिक्षक पी़बी़ अहिरराव, के़ यू़ छत्रे, कोपरगाव विभागाचे निरीक्षक बी़टी घोरतळे, ए़ व्ही़ पाटील, अहमदनगर विभागाचे निरीक्षक ए़ बी़ बनकर,कॉन्स्टेबराजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, निहाल उके, संगीता जाधव, वर्षा जाधव यांच्या पथकानेही ही कारवाई केली़ ही दारु कोठून आणली व विक्रीसाठी कुठे नेण्यात येत होती़ याची चौकशी अधिकारी करत आहेत़