राज्यातील ऊस लागवडीत राहुरी विद्यापीठाच्या वाणांचा ९० टक्के वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:43+5:302021-08-22T04:24:43+5:30
या साखर कारखान्यांमध्ये अंदाजे १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १० ...
या साखर कारखान्यांमध्ये अंदाजे १५ हजार कुशल व अकुशल कर्मचारी कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त या कारखान्यांना ऊस तोडण्यासाठी १० ते १२ लाख मजूर राज्यातील कोरडवाहू भागातून येत असतात. या मजुरांना वर्षातील सहा महिन्यांचा शाश्वत रोजगार उपलब्ध होतो. आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनातून उसाचे अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे १४ वाण प्रसारित केले आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण उसाच्या क्षेत्रापैकी सन २०१९-२० मध्ये को ८६०३२ या वाणाखाली ४८ टक्के क्षेत्र, फुले २६५ या वाणाखाली ३४ टक्के क्षेत्र, फुले १०००१ या वाणाखाली ४ टक्के क्षेत्र, को ९२००५ या वाणाखाली ३.६७ टक्के क्षेत्र असे एकूण ९०.५५ टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांखाली आहे.
.................................
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील ऊस संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या केंद्राने विकसित केलेल्या ऊस वाणांखालील महाराष्ट्रात ९० टक्के क्षेत्र आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून, महाराष्ट्र राज्य हे साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे.
- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू
.............
आजपर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी उसाचे १४ उन्नत वाण आणि १०२ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित केलेल्या आहेत. या विकसित वाणांमुळे ऊस उत्पादकांमध्ये आर्थिक स्थैर्य आलेले आहे. म्हणूनच या संशोधन केंद्राचे कार्य दिशादर्शक आहे.
- डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक
.......................
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने गेल्या ८८ वर्षांत ऊस संशोधनाचे भरीव कार्य केले आहे. या केंद्राद्वारे राज्यातील सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या गरजेनुसार उसाच्या प्रसारित जातींचा अनुवंशीकदृष्ट्या शुद्ध मूलभूत बियाणे हे पायाभूत बेणे निर्मितीसाठी देण्यात येते.
- डॉ. भारत रासकर, ऊस विशेषज्ञ
210821\img-20210821-wa0041.jpg
राज्यातील ऊस लागवडीखालील क्षेत्रात राहुरी विद्यापीठाच्या वाणांचा 90 टक्के वाटा