जिल्ह्यात ९२२ नवे कोरोना पॉझिटिव्ह; नगर शहरात ३१९ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:20 PM2020-09-17T22:20:17+5:302020-09-17T22:20:43+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी आणखी १६ जणांचा मृत्यू झाला.
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी आणि राहाता या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. गुरुवारी आणखी १६ जणांचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३० आणि अँटीजेन चाचणीत २९९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (३१९), संगमनेर (२२), राहाता (७१), पाथर्डी (३२), नगर ग्रामीण (५७), श्रीरामपूर (८०), नेवासा (३३), श्रीगोंदा (३४), पारनेर (३०), अकोले (४०), राहुरी (७२), शेवगाव (३९), कोपरगाव (३६), जामखेड (३०), कर्जत (१७) येथील रुग्णांचा समावेश आहे.
गुरुवारी ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर शहर १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर २६, भिंगार ५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
------------
बरे झालेली रुग्ण संख्या: २९०८५
उपचार सुरू असलेले रूग्ण: ५०८१
मृत्यू: ५४९
एकूण रूग्ण संख्या: ३४७१५
------
अॅक्टीव्ह रुग्ण पाच हजार
गुरुवारी ९२२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेत असलेल्या (अॅक्टीव्ह) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे उपचार घेणाºयांची संख्या आता ५ हजार ८१ इतकी झाली आहे. पाच हजारांच्या पुढे प्रथमच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी ५७३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७८ टक्के इतके आहे.