९५ वर्षांचे आजोबा करताहेत कोरोना लसीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:35+5:302021-06-16T04:29:35+5:30

कोतूळ : अकोले तालुक्यात बेलापूर (बदगी) या गावातील मल्हारी महादू हुलवळे या ९५ वर्षांच्या आजोबांनी मार्च महिन्यात पहिला ...

The 95-year-old grandfather is raising awareness about the corona vaccine | ९५ वर्षांचे आजोबा करताहेत कोरोना लसीबाबत जनजागृती

९५ वर्षांचे आजोबा करताहेत कोरोना लसीबाबत जनजागृती

कोतूळ : अकोले तालुक्यात बेलापूर (बदगी) या गावातील मल्हारी महादू हुलवळे या ९५ वर्षांच्या आजोबांनी मार्च महिन्यात पहिला तर मे महिन्यात दुसऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस घेतले. विज्ञान युगातील लोक लसींवर शंका घेत असताना या आजोबांनी वयाच्या शंभरीच्या घरात असताना वेळेत लसीकरण करून घेत व्हॅक्सिन ग्रॅन्डपाची भूमिका पार पाडत आहेत.

अकोले तालुक्यातील बेलापूर (बदगी) गावातील मल्हारी पाटील नावाने ते प्रसिद्ध आहेत. ११ सप्टेंबर १९२६ ही त्यांची जन्मतारीख. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ पासून पुढे दहा वर्षे गावचे पोलीस पाटील म्हणून त्यांनी काम केले.

कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण भागात अनेक अफवा पसरवल्या जात असताना मल्हारी हुलवळे बारा किलोमीटरवरील ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसींचे दोन्ही डोस घेतले. शिवाय गावात ते भेटेल त्याला लस घेतली का ? असे विचारतात. घेतली नसेल तर प्लेग व इतर रोगराईतील अनुभव सांगतात. लसीकरणाचे महत्त्व सांगतात. दिवसभरात ते किमान २५ लोकांना हा सल्ला देतात. सध्या ते दिवसभरात मंदिरात जाणे, पारावर गप्पा मारणे तसेच गावातील सार्वजनिक वाचनालयातील वृत्तपत्र वाचण्याचा छंद जोपासतात.

............

वनचराई आंदोलनात घेतला होता सहभाग

मल्हारी पाटलांनी महात्मा गांधी यांच्या वनचराई आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. बेलापूर गावात साताऱ्याचे नाना पाटील म्हणजे पत्री सरकार यांची मुंबईकर ग्रामस्थांच्या मदतीने मिरवणूक काढली तर गावातील शिक्षण व सामाजिक सुधारण्यात अग्रेसर होते.

.......

१५ मल्हारी हुलवळे

150621\img-20210613-wa0208.jpg

??????? ?????? ????? ????

Web Title: The 95-year-old grandfather is raising awareness about the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.