म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

By शेखर पानसरे | Published: October 16, 2022 06:33 PM2022-10-16T18:33:21+5:302022-10-16T18:34:03+5:30

संगमनेर येथील म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 

A boy has died after going for a bath in Mhalungi river in Sangamner  | म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

म्हाळुंगी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

संगमनेर : शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी - राजापूर परिसरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीवर आईसोबत गेलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १६) सकाळी साडे दहा ते सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. साहिल संतोष कातोरे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, हल्ली रा. एमआयडीसी, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या साहिल कातोरे याचे पालक एमआयडीसी येथे कंपनीत कामाला आहेत. ते मूळचे संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील आहेत. रविवारी सकाळी साहिल त्याच्या आईसोबत म्हाळुंगी नदीमध्ये कपडे धुण्यासाठी आला होता. इतर लोक पाण्यात आंघोळ करत असल्याने तो देखील पाण्यात आंघोळीसाठी उतरला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबत स्थानिकांना समजल्यानंतर संगमनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आरगडे, गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नरेंद्र गुंजाळ, राजापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच बादशहा हासे, तलाठी पोमल तोरण, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय महाले, सचिन उगले, ग्रामसेवक परमेश्वर आहेर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जलतरणपटू ॲड. सदाशिव थोरात, ज्ञानेश्वर हासे, बाबजी हासे व इतरही पोहणाऱ्या व्यक्तींनी बुडालेल्या साहिल कातोरे याचा शोध सुरू केला. काही वेळाने त्याला पात्रातून बाहेर काढत घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

Web Title: A boy has died after going for a bath in Mhalungi river in Sangamner 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.