संगमनेरातील रायते हद्दीतील विहिरीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 21:58 IST2024-04-21T21:58:09+5:302024-04-21T21:58:22+5:30
अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

संगमनेरातील रायते हद्दीतील विहिरीत आढळला मृतदेह
शेखर पानसरे, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रायते गावच्या हद्दीत चौफुली जवळील एका विहिरीत रविवारी (दि.२१) साधारण ३५ ते ४० वयोगटातील अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे अंगात काळ्या रंगाचा शर्ट असून त्यावर लाल रंगाच्या चौकटी तसेच निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट आहे. हातावर गोंदण आहे, त्यात त्रिशूल डमरू, आई, आणि एसएस अशी अक्षरे गोंधलेली आहेत.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरही या संदर्भाने कुणाला अधिक माहिती असल्यास अथवा मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन अथवा ०२४२५२२५३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.