संगमनेरमध्ये मारहाणीत शेतकऱ्याचा पाय झाला फॅक्चर
By शेखर पानसरे | Published: May 16, 2023 01:41 PM2023-05-16T13:41:36+5:302023-05-16T13:42:03+5:30
संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, यात दोन महिलांचा देखील समोवश आहे.
संगमनेर : सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक फिरवल्याने शेतकऱ्याला मारहाण करत ढकलून देण्यात आले. यात शेतकऱ्याचा पाय फॅक्चर झाला झाला. हा प्रकार रविवारी (दि.१४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव तळ येथे घडला. या प्रकरणी सोमवारी (दि.१५) संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला, यात दोन महिलांचा देखील समोवश आहे.
संजय बाळासाहेब नेहे (वय ४३, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) असे मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र बाळासाहेब नेहे, सौरभ बाळासाहेब नेहे यांच्यासह दोन महिलांविरुद्ध (सर्व रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) गुन्हा दाखल झाला आहे.
सामायिक विहीर असून तेथील पिण्याच्या पाण्याचा कॉक संजय नेहे यांनी फिरवला. त्या रागातून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. बांधावरून खाली ढकलून देत पुन्हा विहिरीवर आल्यास ‘तुला व तुझ्या पत्नीला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत ढकलून देण्यात आले. यात संजय नेहे यांचा पाय फॅक्चर झाला. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. एस. पाटोळे अधिक तपास करीत आहेत.