जिल्हा बँकेतील फुटीर संचालकांचा निषेध करत श्रीरामपुरात विरोध प्रदर्शन
By शिवाजी पवार | Updated: March 10, 2023 17:25 IST2023-03-10T17:24:33+5:302023-03-10T17:25:18+5:30
बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाआघाडीतील घटक पक्षांचे बहुमत असताना घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

जिल्हा बँकेतील फुटीर संचालकांचा निषेध करत श्रीरामपुरात विरोध प्रदर्शन
श्रीरामपूर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात मतदान केलेल्या संचालकांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. बँकेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले यांचा भाजपच्या शिवाजी कर्डिले यांनी पराभव केला होता. बँकेत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महाआघाडीतील घटक पक्षांचे बहुमत असताना घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांनी शुक्रवारी विरोधात मतदान केलेल्या संचालकांचा निषेध नोंदविला.
यावेळी तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, महिला शहराध्यक्ष अर्चना पानसरे, जयंत चौधरी, अल्तमेश पटेल, किशोर बकाल, सुधाकर आडांगळे, युवक शहराध्यक्ष सोहेल शेख, उपाध्यक्ष सेफ शेख, जिल्हा सरचिटणीस नितीन गवारे, अरुण कवडे, विद्यार्थी शहराध्यक्ष गोपाल वायदेशकर, शफीभाई शहा, रवी गरेला, रंजन वाव्हळ, प्रसन्ना शेटे उपस्थित होते.