आदिवासी विद्यार्थ्यांचे नगरमध्ये उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 01:08 PM2017-12-03T13:08:19+5:302017-12-04T11:43:31+5:30
येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात असुविधांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळपासून वसतिगृहासमोर उपोषण सुरू केले. याच विद्यार्थ्यांनी शनिवारी दिवसभर अन्नत्याग केला होता.
आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात असुविधांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळपासून वसतिगृहासमोर उपोषण सुरू केले. याच विद्यार्थ्यांनी शनिवारी दिवसभर अन्नत्याग केला होता.
माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्त्वाखाली पाईपलाईन रोडवरील भिस्तबागा नाका येथील या वसतिगृहात विद्यार्थ्यांना कॉट, संगणक, लॅब, अभ्यासिका आदी सुविधा दिलेल्या नाहीत. अशुद्ध पाणी आणि निकृष्ट भोजन दिले जाते. याबाबत राजूर येथील आदिवासी प्रकल्प विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण केले. जोपर्यंत चांगले भोजन मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रकल्प अधिकाºयांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. अधिकारी न आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयालवर मोर्चा नेवून तिथेच उपोषण करणार आहेत. ‘आमच्या मागण्या पूर्ण करा... नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. आदिवासी प्रकल्प विभागाचे कार्यालय राजूर (ता.अकोले )येथे आहे. त्यामुळे या उपोषणाची दखल घेण्यासाठी अधिकारी येणार की हे आंदोलन आणखी चिघळणार याकडे लक्ष लागले आहे.